प्लॉट घ्यायचा कि फ्लॅट? – तुमच्या भविष्यासाठी योग्य गुंतवणूक कोणती?

आपल्या आयुष्यात घर हे एक स्वप्न असतं – आपलं स्वतःचं घर. आजच्या घडीला अनेक पर्याय उपलब्ध आहेत – फ्लॅट, बंगला, पेंटहाऊस… पण सध्याच्या काळात ‘प्लॉट’ ही संकल्पना पुन्हा एकदा केंद्रस्थानी येत आहे. आणि का नाही येणार? कारण प्लॉट ही केवळ जागा नसून, तुमच्या स्वप्नांची सुरुवात असते!

१. तुमचं स्वप्न, तुमच्या अटींवर!

फ्लॅटमध्ये आपल्याला ठराविक जागा, ठराविक डिझाईन आणि मर्यादित मोकळीक असते. पण प्लॉट घेतल्यावर तुम्ही तुमच्या मनासारखं घर बांधू शकता – किती मजले हवेत, कुठे गार्डन असावं, घरात वाऱ्याचा आणि प्रकाशाचा वावर कसा असावा… सगळं तुमच्या मनासारखं!

 

२. दरवर्षी वाढणारी किंमत

प्लॉट्सचे दर दरवर्षी वाढतच आहेत. शहराचा विस्तार होत असताना प्लॉट्स ही दुर्मिळ गोष्ट बनत चालली आहे. आज घेतलेला प्लॉट, भविष्यामध्ये रिंगरोड, नॅशनल हायवे अश्या अनेक गोष्टींमुंळे तुमच्यासाठी सोन्याची गुंतवणूक ठरू शकतो!

 

३. देखभालीचा खर्च कमी

फ्लॅट घेतल्यावर मेंटेनन्सचा खर्च दरमहिन्याला लागतो. लिफ्ट, सेक्युरिटी, पार्किंग अशा गोष्टींसाठी तुम्हाला खर्च करावा लागतो. पण प्लॉट घेतल्यावर, तो बांधायचा की नाही हे तुमचं ठरतं. देखभालही तुमच्या हातात!

 

४. नवे प्रोजेक्ट्स – गुंतवणुकीसाठी सुवर्णसंधी

शहरांच्या आसपास सध्या भरपूर नवे प्लॉट प्रोजेक्ट्स सुरू आहेत – रस्ते, वीज, पाणी अशा सोयीसुविधांसह. सुरुवातीच्या टप्प्यात प्लॉट घेतल्यास कमी दरात खरेदी करता येते, आणि पुढे ती जागा डेव्हलप झाल्यावर तीच किंमत दुप्पट-तिप्पट होऊ शकते.

 

५. वारसा म्हणून पुढच्या पिढ्यांसाठी एक मजबूत आधार

प्लॉट ही अशी संपत्ती आहे जी तुमच्यानंतरही कायम राहते – तुमच्या मुलांना, नातवंडांना उपयोगी ठरते. घराचे भिंती जुन्या होतात, पण प्लॉटची किंमत वेळेसोबत वाढत जाते. म्हणूनच, प्लॉट म्हणजे केवळ गुंतवणूक नाही, तर ती आहे generational wealth’ चं दार उघडणारी संधी!

तुमच्या आजूबाजूला प्लॉट मिळत असेल, तर विचार करा!

शहराच्या सीमेवर, निसर्गाच्या सानिध्यात, उत्तम कनेक्टिव्हिटी असलेल्या एखाद्या ठिकाणी प्लॉट मिळत असेल, तर त्याकडे दुर्लक्ष करू नका. ही केवळ जमीन नाही, तर ते आहे तुमचं स्वप्न, स्थैर्य, आणि उज्ज्वल भविष्याची बीजं रुजवणारी जागा. 

अविष्कार इन्फ्रा कडे तुमच्यासाठी तयार आहेत अनेक डिव्हेलप प्लॉट्स स्कीम्स – सर्व कायदेशीर परवानग्या, सोयीसुविधा आणि चांगली कनेक्टिव्हिटीसह सर्वोत्तम लोकेशनवर.

आजच भेट द्या आणि आपल्या स्वप्नांची पायाभरणी करा!